लोकांसाठीलोकांनीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

एकटा आवाज → नोंदबद्ध नागरिक समूह

व्यवस्थेशी भांडायचे नाही. व्यवस्थेला तिची जबाबदारी आठवून द्यायची.

एकाच समस्येचा सामना अनेक लोक करत असतील तर पुरावे, complaint references आणि लागू नियम एकत्र करून शांततापूर्ण, कायदेशीर आणि तथ्याधारित सामूहिक पाठपुरावा करा.

Aapla Swarajyaचा नियम: व्यक्तीला target करू नका. पद, कार्यालय, service standard, आदेश आणि नोंद यांवर बोला. धमकी, doxxing, abuse किंवा mob pressure नाही.

सामूहिक उत्तरदायित्वाची पद्धत

सगळ्यांनी वेगवेगळे ओरडण्याऐवजी एकच स्पष्ट record तयार करा.

01समस्या समान आहे का?

सर्व लोकांची समस्या खरोखर एकाच authority/function शी संबंधित आहे का ते आधी तपासा.

02पुरावे standard करा

तारीख, ठिकाण, फोटो, complaint ID, response/no-response अशी समान chronology ठेवा.

03जबाबदारीचा स्रोत जोडा

Citizen Charter, RTS notification, circular, Act, official department page किंवा work order यापैकी लागू स्रोत दाखवा.

04संयुक्त निवेदन

समस्या, आधी केलेल्या कृती, लागू जबाबदारी आणि मागितलेला specific remedy संक्षिप्तपणे लिहा.

05Reference मिळवा

प्राप्ती, inward number, grievance ID किंवा email delivery record ठेवा.

06योग्य पुढची पायरी

वेळमर्यादा/response route नुसार supervisor, appeal, RTI किंवा grievance mechanism वापरा.

चुकीची पद्धत

“हा अधिकारी चोर आहे”

पुरावा नसलेला वैयक्तिक आरोप, फोन नंबर/घरचा पत्ता प्रसारित करणे, धमकी किंवा online pile-on टाळा.

योग्य पद्धत

“या कार्यालयाची ही जबाबदारी आहे”

“12 नागरिकांच्या complaint IDs जोडल्या आहेत. notified deadline संपली आहे. कृपया कारण व कृतीची नोंद द्या.” — तथ्य, प्रक्रिया आणि record.

एकत्र येण्याआधी

सहमती आणि गोपनीयता राखा.

सहमतीएखाद्याचे नाव/phone/complaint record सामूहिक निवेदनात टाकण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्या.
किमान डेटाAadhaar/PAN/medical information सारखी संवेदनशील माहिती सार्वजनिक sheet मध्ये टाकू नका.
तथ्य वेगळे ठेवातथ्य, अंदाज आणि मत वेगवेगळे दाखवा.