जनहितजबाबदारीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

7 जुलै 2026 नियमांनुसार अद्ययावत

RTI — माहिती मिळवण्याचे साधन, तक्रार पेटी नाही.

महाराष्ट्राने 7 जुलै 2026 रोजी नवीन अधिसूचना प्रसिद्ध करून 12 जून 2026 ची अधिसूचना supersede केली. या पानावरील शुल्क व प्रक्रिया त्या सध्याच्या राजपत्रानुसार दुरुस्त केली आहे.

महत्त्वाची दुरुस्ती: जूनची आवृत्ती सध्याची नाही

पूर्वीच्या मार्गदर्शनात जूनमधील नंतर बदललेले शुल्क दाखवले गेले होते. 12 जून 2026 ची अधिसूचना 7 जुलै 2026 च्या महाराष्ट्र राजपत्राने supersede केली. त्यामुळे ₹30 अर्ज, ₹5/पान, ₹50 पहिली अपील, ₹100 दुसरी अपील आणि सर्व अर्जदारांसाठी photo-ID आवश्यक असल्याची जून-आवृत्ती माहिती सध्याची मानू नका.

RTI कशासाठी वापरायचा?

RTI म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाकडे अस्तित्वात असलेली माहिती, नोंदी, आदेश, फाइल नोटिंग, प्रमाणित प्रती किंवा नोंदींचे निरीक्षण मागण्याचा कायदेशीर मार्ग. “माझा रस्ता दुरुस्त करा” ही तक्रार आहे; “या रस्त्याच्या दुरुस्ती आदेशाची व खर्च मंजुरीची प्रमाणित प्रत द्या” ही RTI विनंती होऊ शकते.

सर्वात आधी: योग्य सार्वजनिक प्राधिकरण ओळखा. चुकीच्या संस्थेकडे केलेला अर्ज वेळ वाया घालवू शकतो.

महाराष्ट्रातील सध्याचे RTI शुल्क — 7 जुलै 2026

घटकमहाराष्ट्रकेंद्र सरकार (RTI Rules 2012)
अर्ज फी₹10₹10
A4 / A3 प्रत₹2 / page + टपाल खर्च₹2 / page
नोंदींचे निरीक्षणपहिला तास मोफत; नंतर प्रत्येक 15 मिनिटे किंवा त्याचा भाग ₹5पहिला तास मोफत; नंतर प्रत्येक तास/त्याचा भाग ₹5
पहिली अपील₹20फी नाही
दुसरी अपील₹20फी नाही

महाराष्ट्र नियमांनुसार एक अर्ज एका विषयापुरता असावा आणि साधारणपणे 150 शब्दांपेक्षा जास्त नसावा. 7 जुलैच्या Annexure A मध्ये सर्वसाधारण अर्जदारासाठी photo-ID जोडण्याची अट नाही; BPL फी-सवलत मागणाऱ्या अर्जदारासाठी BPL प्रमाणपत्राची प्रत नमूद आहे.

महाराष्ट्रात अर्ज कसा करावा

योग्य प्राधिकरण आणि PIO शोधा

तुम्हाला हवी असलेली नोंद कोणाकडे तयार/ठेवली जाते ते आधी शोधा.

एक विषय, विशिष्ट नोंदी

“का?” या मताधारित प्रश्नांऐवजी आदेश, मंजुरी, फाइल नोटिंग, पत्रव्यवहार, नोंदवही, प्रमाणित प्रत अशी अस्तित्वात असलेली माहिती मागा.

₹10 फी आणि acknowledgment जतन करा

ऑनलाइन महाराष्ट्र RTI Portal उपलब्ध आहे. ऑफलाइन अर्जात वर्तमान नियमांनुसार Annexure A नमुना/मान्य payment mode पहा.

उत्तराची वेळमर्यादा

सर्वसाधारणपणे RTI Act अंतर्गत PIO कडून 30 दिवसांत निर्णय अपेक्षित असतो. जीवन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहितीच्या बाबतीत 48 तासांची तरतूद आहे. इतर विशेष परिस्थितींमध्ये वेगळे नियम लागू होऊ शकतात.

उत्तर नाही / अपूर्ण उत्तर — अपील

1

पहिली अपील

PIO च्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्धारित वेळेत निर्णय न मिळाल्यास संबंधित First Appellate Authority कडे. महाराष्ट्रात सध्याची फी ₹20.

2

दुसरी अपील

पहिल्या अपीलच्या निकालानंतर लागू परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे. सध्याची फी ₹20.

चांगली RTI विनंती कशी लिहावी

  • एकच विषय ठेवा आणि तारीख/कालावधी स्पष्ट द्या.
  • “कारवाई करा” ऐवजी “कारवाई नोंद/फाइल नोटिंग/आदेशाची प्रमाणित प्रत द्या” असे मागा.
  • अधिकाऱ्याचे मत/स्पष्टीकरण तयार करून देण्याऐवजी अस्तित्वात असलेली नोंद मागा.
  • अर्जाची प्रत आणि acknowledgment जतन करा.
उदाहरण: “1 जानेवारी 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत [रस्ता] संदर्भात प्राप्त खड्डा तक्रारींची संख्या, प्रत्येक तक्रारीचा disposal status आणि संबंधित work order ची प्रमाणित प्रत द्यावी.”

अधिकृत स्रोत

21 ऑगस्ट 2026 रोजी पडताळले

Maharashtra RTI Online Portal · Maharashtra RTI Rules, 7 July 2026 (local public copy) · Maharashtra State Information Commission · Central RTI Online

टीप: कायदा/राजपत्र आणि या सारांशात फरक असल्यास कायदा/राजपत्र प्राधान्याने मानावे.