जनहितजबाबदारीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

अधिकारक्षेत्र मार्गदर्शक

समस्या दिसते. पण जबाबदार कोण?

मुंबईत “रस्ता म्हणजे BMC” किंवा “ट्रॅफिक म्हणजे फक्त पोलीस” अशी सोपी समीकरणे अनेकदा चुकीची असतात. मालमत्ता, सेवा, अंमलबजावणी आणि प्रकल्पाचे अधिकारक्षेत्र वेगळे असू शकते.

प्रतिनिधीला tag करण्याआधी: समस्येचे operational owner शोधा. MP/MLA/इतर प्रतिनिधी मुद्दा उचलू शकतात; पण दुरुस्ती/सेवा कोणत्या department/agency ने करायची हे वेगळे असते.
नियम: तक्रार करण्यापूर्वी “ही जागा/रस्ता/सेवा कोणाच्या ताब्यात आहे?” हे पडताळा. खालील माहिती सामान्य दिशा देते; विशिष्ट रस्त्याचे मालकी/देखभाल अधिकार प्रकल्पानुसार बदलू शकतात.
BMC / MCGM
सामान्य दिशा: महानगरपालिका नागरी सेवा आणि BMC च्या ताब्यातील पायाभूत मालमत्ता. routine municipal grievances साठी BMC चे अधिकृत complaint system वापरा.
Official site ↗
Mumbai Police
सामान्य दिशा: कायदा-सुव्यवस्था, गुन्हे, पोलीस संबंधित बाबी. तातडीच्या धोक्यात 112/100; गंभीर cognizable matter साठी जवळचे पोलीस स्टेशन.
Official site ↗
Mumbai Traffic Police
सामान्य दिशा: वाहतूक नियमांची अंमलबजावणी, सुरक्षित/सुरळीत वाहतूक, traffic grievance. परंतु physical road engineering/repair दुसऱ्या road-owning authority कडे असू शकते.
Official site ↗
MMRDA
सामान्य दिशा: MMR मधील निवडक मोठे transport infrastructure projects, Metro-related planning/projects, bridges/roads/FOBs/multimodal works आणि इतर प्रकल्प. प्रत्येक रस्ता MMRDA चा नसतो.
Official site ↗
Maharashtra PWD
सामान्य दिशा: राज्याच्या ताब्यातील roads, bridges आणि government buildings; PWD च्या jurisdiction मधील pothole service सुद्धा RTS अंतर्गत notified service म्हणून सूचीबद्ध आहे.
Official site ↗
BEST
सामान्य दिशा: BEST च्या operational क्षेत्रातील bus services आणि electricity-related services. नेमकी सेवा/क्षेत्र तपासून योग्य BEST channel वापरा.
Official site ↗

उदाहरण

एका धोकादायक चौकात तीन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असू शकतात

Enforcement

signal jumping, illegal movement किंवा वाहतूक नियमांची अंमलबजावणी — Traffic Police चा भाग असू शकतो.

Road engineering

road surface, divider, physical geometry किंवा road-owned infrastructure — asset owner BMC/PWD/MMRDA/इतर असू शकतो.

System improvement

वारंवार अपघात/जाम असल्यास अनेक agencies समन्वयाने बदल करणे आवश्यक असू शकते. हाच systemic issue चा प्रकार आहे.

एखाद्या अधिकारक्षेत्राबाबत खात्री नाही?

पहिले संबंधित official websites, ward/project information आणि उपलब्ध public records तपासा. आम्ही भविष्यात verified “Who Does What?” directory वाढवत राहू.

नोंदी RTI ने कशा मागाव्या