लोकांसाठीलोकांनीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

UPSC सारखी रचना — नागरिकांच्या भाषेत

कोण काय करतो हे समजलं की अर्धी लढाई संपते.

भारताची सार्वजनिक व्यवस्था एकच कार्यालय नाही. केंद्र, राज्य, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेष प्राधिकरणांची वेगवेगळी कार्यक्षेत्रे आहेत.

सर्वात महत्त्वाचा नियम: व्यक्तीपासून सुरुवात करू नका. कार्यापासून सुरुवात करा — “हा रस्ता कोणाचा?”, “हा certificate कोण देतो?”, “या सेवेला वेळमर्यादा आहे का?”

मोठा नकाशा

तक्रार करण्याआधी कोणत्या पातळीचा विषय आहे ते ओळखा.

भारत संघ
केंद्रीय कायदे, मंत्रालये आणि Union subjects. उदाहरणार्थ अनेक केंद्रीय विभाग, रेल्वे किंवा केंद्रीय करांसाठी त्यांचे स्वतंत्र grievance/appeal मार्ग असतात.
ParliamentUnion MinistriesCPGRAMS
महाराष्ट्र राज्य
राज्य विभाग, राज्य योजना, महसूल प्रशासन आणि notified public services. अनेक सेवांसाठी Aaple Sarkar/RTS प्रणाली वापरली जाते.
State DepartmentsAaple SarkarRTS
जिल्हा प्रशासन
Collector/District Magistrate स्तर महसूल, जमीन अभिलेख, काही certificates, आपत्ती, निवडणूक व विविध राज्य कामांचे समन्वय करतो. मुंबई City आणि Mumbai Suburban हे स्वतंत्र जिल्हा प्रशासन आहेत.
CollectorTehsildarLand Records
BMC / MCGM
महानगरपालिका पातळीवर पाणी, अनेक रस्ते, storm-water drainage, sewerage, solid waste, public health आणि इतर नागरी सेवा येतात. पण प्रत्येक रस्ता/मालमत्ता BMC चीच असेल असे नाही.
Municipal CommissionerDepartments24 Wards
प्रशासकीय वॉर्ड
BMC च्या current official page नुसार मुंबई 24 administrative wards मध्ये विभागलेली असून प्रत्येक वॉर्डचा प्रशासकीय प्रमुख Assistant Commissioner असतो.
Assistant CommissionerWard DepartmentsLocal Delivery

BMC च्या आत

“BMC” हा एकच counter नाही.

नागरिकाचा प्रश्नउदा. कचरा / रस्ता / पाणी
योग्य विभागकार्य कोणाच्या अखत्यारीत?
वॉर्ड / HODस्थानिक किंवा citywide विषय
नोंद व referenceतारीख, फोटो, complaint ID
पुढची पातळीवरिष्ठ / appeal / RTI

लोकशाही + प्रशासन

निवडून दिलेला प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी एकच काम करत नाहीत.

प्रतिनिधित्व / कायदे

MP · MLA · स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी

लोकांचे प्रतिनिधित्व, कायदे/धोरण/बजेट प्रक्रियेत भाग, प्रश्न उपस्थित करणे आणि सार्वजनिक मुद्द्यांवर राजकीय/लोकशाही oversight. पण एखाद्या विभागाचे day-to-day engineering किंवा file processing ते स्वतः करत नाहीत.

अंमलबजावणी / प्रशासन

सचिवालय · जिल्हाधिकारी · महानगरपालिका अधिकारी · विभाग

कायदे, नियम, मंजूर योजना आणि प्रशासकीय आदेश अंमलात आणणे; service delivery, files, contracts, inspections आणि records सांभाळणे. नागरिकाच्या तक्रारीत operational accountability सहसा इथे शोधावी लागते.

उदाहरण: खड्ड्यासाठी तुमच्या MLA/MP ला tag करणे publicity/representation साठी उपयोगी असू शकते, पण आधी रस्ता कोणत्या agency चा आहे आणि त्या agency चा complaint/engineering route कोणता आहे हे शोधणे जास्त अचूक आहे.

District Collector कधी relevant?

जमीन/महसूल, काही certificates, land records, निवडणूक प्रशासन, नैसर्गिक आपत्ती आणि district-level state administration यांसारख्या विषयांमध्ये. Mumbai Suburban च्या अधिकृत माहितीत ही कार्ये स्पष्ट दिली आहेत.

अधिकृत माहिती →

Municipality कधी relevant?

भारतीय संविधानाच्या Part IXA / Twelfth Schedule मध्ये नगरपालिकांच्या विषयांचा घटनात्मक आधार दिला आहे. प्रत्यक्ष मुंबईत विभागणी राज्य कायदे व BMC च्या कार्यरचनेनुसार होते.

2026 संविधान आवृत्ती →
ही page “कोण मोठा?” यासाठी नाही. ती कोणत्या कामासाठी कोणते कार्यालय? हा प्रश्न सोडवण्यासाठी आहे. अनेक authorities समांतर काम करतात; म्हणून issue-based route महत्त्वाचा.